Image used for representational purpose | (Photo Credit: PTI)

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच नैसर्गिक गॅसच्या किंमती 10% वाढल्या आहेत. या दरवाढीचा फटका सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि पीएनजी (पाईप्ड नॅचनल गॅस) गॅस वापरणाऱ्यांना बसणार आहे. अमेरिका, रशिया आणि कॅनडा या देशांतील गॅसच्या दरानुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील नैसर्गिक वायूचे दर ठरत असतात. गेल्या सहा महिन्यात गॅसचा दर 3.36 डॉलर (MMBTU) होता. तर आता तो 3.69 डॉलर (MMBTU) झाला आहे.

मुंबईत सीएनजी गॅस प्रतिकिलो 1.51 रुपये तर पीएनजी गॅस 1.88 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सामान्य जनतेवर महागाईचा बोजा पडणार आहे. मात्र पीएनजी गॅसच्या व्यावसायिक आणि उद्योगासाठी वापराच्या गॅसदरात कपात करण्यात आली आहे.

3 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून महानगर गॅसने देखील दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर 49.61 रुपयांवरुन 51.57 रुपयांवर गेले आहेत. याचा फटका महानगर गॅसच्या 10 लाख घरगुती पीएनजी ग्राहकांना तर 7 लाखांहून अधिक सीएनजी वाहनधारकांना बसणार आहे.