Monsoon (Photo Credits: Wikimedia Commons)

जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर पावसाची गैरहजेरी दिसून आल्याने नागरिक पुन्हा उन्हाच्या उकाड्याने हैराण झाल्याचे दिसून आले आहेत. मात्र आता मुंबईकरांसाठी पावसासंबंधित एक दिलासादायक बातमी आहे. कारण पुढील दोन दिवस मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आयएमडी यांनी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

येत्या 24 तासात मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आयएमडी यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी कोसळल्याचे दिसून आले होते. तसेच गुरुवारी सुद्धा अधूनमधून पावसाच्या सरी बसरल्या आहेत.(Mumbai Monsoon 2020 Updates: येत्या 2 दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता; IMD चा अंदाज)

या आठवड्यात मुंबईत 100mm पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. परंतु जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पावसाळ्याच्या काळात डेंग्यु, मलेरिया सारखे आजार पसरु नये म्हणून सुद्धा विविध ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे.