प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Wikimedia Commons)

मुंबई (Mumbai) सह उपनगरात मागील दोन दिवसांपासून पावसाचा वेग किंचित मंदावला आहे. सांताक्रूझ (Santacruz) , कुलाबा (Coloba)  या परिसरात मध्यम प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र हा पावसाचा ओसरलेला जोर 14 ऑगस्टच्या सुमारास पुन्हा एकदा वाढण्याची शक्य आहे असे स्कायमेट वेदर (Skymet Weather)  या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थेने काही वेळापूर्वी सांगितले आहे. मुंबईलगत समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुंबईत पाऊस वाढेल व मान्सूनची लाट सक्रिय होईल. तसेच या कालावधीत शहरात एक किंवा दोन जोरदार गडगडाटीसह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

याप्रमाणे उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ परिसरात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ किंवा मुंबईत पुराची स्थिती निर्माण होईल असा पाऊस होणार नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. Maharashtra Monsoon 2019: पुरस्थितीमुळे एसटी महामंडळाला 100 कोटींचा फटका

Skymet ट्विट

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मागील काही दिवसात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा सह लगतचे परिसर जलमय झाले होते, इथे अडकलेल्या नागरिकांची आता सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तसेच जनजीवन पुर्वव्रत करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. या पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 4 (NH-4) वरील वाहतूक गेल्या 8 दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने आवश्यक वस्तूंच्या दळणवळणासाठी अवजड वाहनांसाठी हा महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे.