
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांसह त्याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झाला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने स्थानिक वाहतुक कोलमडली आहे. याच पार्श्वभुमीवर पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीने सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम एनडीएफचे जवान करत आहेत. तसेच नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रशासनाने सुद्धा हात पुढे केले आहेत. मात्र पुरस्थितीमुळे एसटी महामंडळाचे कोटीचे नुकसान झाले आहे.
पुरस्थितीमुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. तर मराठवाडा सोडून अन्य राज्यातील वाहतुक ठप्प झाली आहे. एसटी बसचा दररोज 55 लाख किमी प्रवास होत असून त्यामधून 22 कोटी रुपये मिळतात. परंतु गेल्या काही दिवसात राज्यात सक्रिय झालेल्या पावसामुळे 10 लाख किमीच्या बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम बसच्या उत्त्पन्नावर होत असून जवळजवळ 100 कोटींचा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(खानदेशात महापुर येण्याची शक्यता, 14 तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत)
कोल्हापूर येथे दररोज धावणाऱ्या एसटीमुळे 50 लाख रुपयांचा महसुल मिळतो. मात्र येथे पुरस्थिती निर्माण झाल्याने आतापर्यंत एकही एसटी बस धावली नाही आहे. तसेच पुर ओसरल्यानंतर एसटी महामंडळाचे अधिक नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.