खानदेशात महापुर येण्याची शक्यता, 14 तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Flood (Photo Credits: Twitter)

राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे येथील पुरस्थितीमुळे 20 पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.तसेच या पुराचा फटका प्राण्यांनासुद्धा बसला असून त्यांचे हाल होत आहेत. त्यानंतर आता खानदेशात (Khandesh) सुद्धा महापुर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 14 तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन आता विस्कळीत झाले आहे.

धुळे आणि नंदुरबार येथे पावसाने कहर केला असून तापी, पांझरा, बुराई, अरुणावती यांसारख्या नद्यांना महापूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा फटका नागरिकांना बसला असून अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने घर सोडावे लागले आहे. तसेच या पुराच्या स्थितीमुळे या ठिकाणी आता पर्यंत तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक महामार्ग बंद झाले आहेत.(Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?)

महापुराची स्थिती उद्धभवू नये म्हणून तेथील प्रशासनाने फायबर बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड यांच्यासह अन्य महत्वाच्या गोष्टींची सोय करण्यात आली आहे. त्याचसोबत पुराची स्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.