Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?
Sangli Flood Relief ( Photo Credits: Twitter)

पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागील 30 वर्षांतील विक्रमी पाऊस मागील आठवड्याभरात झाला आहे. या पावसाच्या थैमानामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर या शहराला पूराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. अडीच लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आज सलग 6 व्या दिवशीही युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. पावासाचा जोर ओसरल्यानंतर आणि पूराचे पाणी कमी झाल्यानंतर आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक सामान्य नागरिक, देवस्थानं मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. आता या स्थितीमध्ये नेमका तुम्ही कसा खारीचा वाटा उचलू शकाल? असा प्रश्न आला असेल तर पहा ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून तुम्ही पूरग्रस्तांना कशी मदत करू शकाल? हे जाणून घ्या . अनेकदा सोशल मीडीयात खोटे मेसेज बनवून फसवणूक केली जाण्याची शक्यता असते. म्हणून नेमकी कोणत्या स्वरूपातील मदत खरंच पूरग्रस्तांपर्यंत पोहचू शकेल याचे हे खात्रीशीर पर्याय पहा आणि मदतीसाठी पुढे या.

सरकारी यंत्रणेसोबतच सध्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. आर्थिक मदतीसोबतच सध्या पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तू, अन्न, पाणी, औषधं यांची गरज अधिक आहे. कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना शिर्डी देवस्थानाकडून 10 कोटीची मदत तर सिद्धिविनायक मंदिरकडून पिण्याच्या पाण्याची सोय

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

राज्य सरकारकडून पूर, दुष्काळ किंवा नैसर्गिक संकटात अडकलेल्यांसाठी मदत करणार्‍यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे. येथे ऑनलाईन माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येऊ शकतात. तुम्हांला पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वैयक्तित किंवा संस्थेच्या पातळीवर मदत करता येऊ शकते. यासाठी येथे क्लिक करा.

नाम फाऊंडेशन

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी काम करणारी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची 'नाम' ही संस्था आता महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. त्यांनीही काही वस्तूंच्या स्वरूपात मदतीचं आवाहन केलं आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने फेसबुकच्या माध्यमातून हा मदतीचा हात पुढे करत साऱ्यांनाच सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. मुंबई,पुणे आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी या काही अत्यावश्यक वस्तू दान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

यासोबतच अनेक सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी नागरिकांना काही वस्तू एकत्र गोळ्या करून दान करण्यासाठी आवाहन केलं आहे. याच्या माध्यमातून गरजवंतांना मदत दिली जाणार आहे.