Mumbai Metro चा प्रवास Post Lockdown सुरक्षित व्हावा यासाठी आसन व्यवस्थेमध्ये होणार बदल; अशी सुरू आहे तयारी (View Pics)
Mumbai Metro | Photo Credits: Twiiter/ Mumbai Metro

भारतामध्ये कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नसला तरीही दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये (Lockdown) असलेल्या भारतीयांना आता खबरदारीची काळजी घेत हळूहळू बाहेर पडण्याची मुभा दिली जात आहे. 'गर्दी' ही मुंबईची ओळख आहे. पण आता कोरोना व्हायरसचा धोका पाहता गर्दी टाळत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घाटाकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणारी मुंबई मेट्रो (Mumbai Metro) देखील मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. मुंबई मेट्रोच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार भविष्यात मेट्रो प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी आसन व्यवस्थेमध्ये बदल केले जाणार आहेत. प्रवासादरम्यान दोघांमध्ये सुरक्षित अंतर रहावं यासाठी आता एक आड एक सीटवर (New Alternate Seating Arrangements) बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी कोणत्या सीट राखीव असतील याची स्टिकर द्वारा माहिती दिली जाईल.

22 मार्च म्हणजे जनता कफ्यूच्या दिवसापासून मुंबईची मेट्रो सेवा प्रवासी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. आता दोन महिन्यांनंतर लॉक डाऊन उठवल्यानंतर नव्या नियमांसह मुंबईची मेट्रो प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता आहे. त्याचचं हे आशादायी चित्र आज मुंबई मेट्रोने ट्वीट केले आहे. मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रोने आता अनलिमिटेड प्रवास करता येणार

Mumbai Metro Tweet

मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचे मुंबई मेट्रो कडे पाहिलं जातं. . मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान 2014 पासून मेट्रो धावायला सुरूवात झाली आहे. 11.4 किमीच्या उन्नत मार्गावर वर्सोवा, डी.एन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जेबी नगर, एअर पोर्ट रोड, मरोळ नाका, साकीनाका, असल्फा,जागृती नगर व घाटकोपर अशी 12 स्थानकं आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणार्‍या मेट्रोमुळे अनेकांचा प्रवास वेगवान होतो.

देशांतर्गत विमान सेवा (२५ मे) सोमवार पासून टप्प्याटप्प्याने सुरु होणार ; पाहा सविस्तर - Watch Video

सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबई शहरात  देशातील शहरांपैकी सर्वाधिक रूग्ण आहेत. दिवसागणिक मुंबईमध्ये रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. सध्या मुंबईमध्ये एकूण रूग्ण संख्या 24 हजारांच्या उंबरठ्यावर आहे.