Mumbai Metro | Photo Credits: Twitter/ Mumbai Metro

महाराष्ट्र मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत पुनश्च हरिओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी हळूहळू व्यवहार पुन्हा सुरू केले जातील असे सांगितले आहे. त्यामध्ये आज (19 ऑक्टोबर) मुंबई मेट्रो (Mumbai Metro) पुन्हा 7 महिन्यांनंतर रूळावर आली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत मेट्रो रेल सेवा पुन्हा केली जाणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील मेट्रो रेल सेवा आज सकाळी 8.30 पासून सुरूवात झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मेट्रो रेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

घाटकोपर ते वर्सोवा या 11 किमी अंतरावर आता मुंबई मेट्रो सेवा सुरू धावायला सुरूवात होणार आहे ही मर्यादीत स्वरूपात असेल. यामध्ये दिवसाला 200 मेट्रोच्या फेर्‍या होणार असून एका वेळी केवळ 350 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. (Maharashtra Mission Begin Again: मुंबईकरांसाठी  मोनोरेल, मेट्रो सेवेला सुरुवात;  पहा काय आहेत नवे नियम).

मेट्रो प्रवासाठी काय आहे नियमावली

  • टोकन ऐवजी पेपर तिकीट किंवा मोबाईल तिकीटचा वापर करावा लागणार.
  • प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग केले जाईल.
  • फेसमास्कचा वापर करणं गरजेचे आहे.
  • आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करण्याचा सल्ला.
  • केवळ Asymptomatic लोकांना परवानगी असेल.
  • मेट्रोमध्ये स्टिकर्सच्या मदतीने कुठल्या जागेवर बसायचं हे सांगितलं जाईल त्याच्याच वापर करावा.

मुंबई मेट्रो स्थानकांमध्ये कोणत्या गेट द्वारा प्रवासी ये-जा करू शकतात?

मेट्रो रेल्वे सेवा सकाळी 8.30 ते रात्री 8.30 अशा 12 तासांच्या मर्यादीत वेळेसाठीच खुली असेल. मेट्रोमध्ये तापमान 25-27 सेंटिग्रेटमध्ये ठेवले जाईल. प्रत्येक फेरीनंतर मेट्रो गाडी सॅनिटाईज केली जाईल.

दरम्यान काल मोनो रेल सेवा देखील खुली झाली आहे. तर मुंबई लोकल अद्यापही केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना मुंबई लोकल मध्ये प्रवेशबंदी आहे.