Devendra Fadnavis | (Photo Credits: PTI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (20 डिसेंबर) जनतेला संबोधित करताना विरोधकांना मुंबई मेट्रो कार शेड प्रोजेक्ट प्रकरणी 'अहंकार' बाजुला ठेवत चर्चा आणि सामोपचाराने कांजुरमार्ग जागेबाबतचा वाद (Kanjurmarg Metro car shed land issue) सोडवूया असं म्हणत विरोधकांना आवाहन केलं होते. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. असं म्हटलं आहे. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको.हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका अशी हात जोडून विनंती असल्याचं म्हटलं आहे. Mumbai Metro Car Shed Project: कांजुर जागेचा वाद चर्चेतून सोडवायला पुढे या; विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन.

देवेंद्र फडणवीस ट्वीट

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यामते, आरे वगळता इतरत्र कुठेही मुंबई मेट्रो कार डेपो नेला तरीही पैसा, वेळ वाया जाणार आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल. बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80% पूर्ण होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल एकदा सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास मोठे आर्थिक नुकसान आहे सोबत 4 वर्षांचा विलंब आहे.

भाजपा कडून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतीने अतुल भातखळकर आणि केशव उपाध्ये यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुंबई मेट्रो 3साठी आरे मध्ये कार डेपो करण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर महाविकास आघाडीने तो आरेमधून कांजूर मार्गला हलवला आहे. मात्र कांजूरच्या जागेवर केंद्र सरकार आणि एका खाजगी मालकाने दावा केल्याने मुंबई कोर्टाने एमएमआरडीएला काम थांबत अंतिम सुनावणीपर्यंत जैसे थे चे आदेश दिले आहेत.