मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 15 सप्टेंबरला मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
मुंबई लोकल | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

मुंबईतील उद्या (15 सप्टेंबर) मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी रेल्वे मार्गावर करण्यात येणाऱ्या विविध कामांमुळे प्रवाशांना दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे थोडे मुश्किलच होते. त्यामुळे नागरिकांनी रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक दरम्यानचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे.

तर मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच वाशी-पनवेल मार्गावरील अप-डाऊन मार्गावर आणि माहिम- गोरेगाव मार्गावर अप-डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.(पालघर रेल्वे स्टेशनवर आता एक्सप्रेस गाड्याही घेणार थांबा; आजपासून सेवा सुरु)

मध्य रेल्वे ट्वीट:

ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरुन लोकल धावणार नाहीत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व्हाया ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकातून जाता येणार आहे.तर पनवेल-अंधेरी मार्गावरील सर्व लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी दरम्यान स्पेशल लोकल ब्लॉकवेळी धावणार आहेत. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-नेरुळ/वाशी दरम्यान लोकल सुरु राहणार आहेत.