पालघर रेल्वे स्टेशनवर आता एक्सप्रेस गाड्याही घेणार थांबा; आजपासून सेवा सुरु
Express Trains | (Photo Credit: Archived, Edited, Representative Images)

पालघर रेल्वे स्टेशनवरुन (Palghar Railway Station) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदवार्ता आहे. आजपासून (शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019) पालघर रेल्वे स्टेशनवर दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस (Express Trains) गाड्याही थांबा घेणार आहेत. मुंबई पश्चिम रेल्वेने (Western Railway ट्विट करुन करुन याबाबत माहिती दिली आहे. पालघर स्टेशनवरुन मुबई शहरात आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी आतापर्यंत केवळ लोकल सेवेचाच आधार घ्यावा लागत होता. मात्र, आता मेल आणि एक्सप्रेस गाड्याही थांबा घेणार असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे.

पालघर स्टेशनवर थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्या खालीलप्रमाणे

(प्रतिमा सौजन्य: पश्चिम रेल्वे, मुंबई)

दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून जोराद स्वागत करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने केलेल्या ट्विटखाली अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रवाशांनी या नव्या सेवेबद्दल पश्चिम रेल्वेचे स्वागत केले आहे. तर, काही प्रवाशांनी वलसाड स्टेशनवरही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे.