मुंबईत (Mumbai) झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर सांताक्रुझ (Santacruz) येथील पटेलनगर भागातील काही घरात गेल्या 72 तासांपासून पाणी शिरल्याची स्थिती निर्माण झाली. याच ठिकाणी दोन जणांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
त्यानंतर मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांनी या विभागात भेट दिली. मात्र या वेळी संतप्त झालेल्या स्थानिकांनी महाडेश्वर यांची गाडी अडवत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या वेळी महाडेश्वर यांनी माझ्यासोबत दादागिरी करुन नका असे कथित रुपात धमकावले असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे.(छे.. छे... 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही'; महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा अजब दावा)
तसेच पटेलनगर मधील स्थानिक रहिवाशांनी त्यांना होणाऱ्या समस्या सांगताना दिसून आले. मात्र महाडेश्वर यांना आपल्यावर होणाऱ्या प्रश्नांच्या भाडीमारामुळे राग आल्याचे दिसून आले. या रागाच्या भरात कथित रुपात त्यांनी एका महिलेचा हात पिरगळा असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे नागरिकांनी महाडेश्वर यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.