Kishori Pednekar's Corona Test Positive: मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar's) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली आहे. किशोरी पेडणेकर यांच्या घरातील सदस्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, 'मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन,' असा विश्वासदेखील किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्र पोलिस दलात कोरोना संपेना, 24 तासात पुन्हा 244 नवे रुग्ण आणि 4 मृत्यु)
मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी
माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली.
आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन pic.twitter.com/ayW43cXGrj
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2020
मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शहरात 2,227 रुग्णांची नोंद झाली. याशिवाय 839 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 25,659 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.