Mumbai: मुंबईत कर्जदारांच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीची आत्महत्या, मृतदेहाजवळ पोलिसांना सापडली सुसाईड नोट
Representational Image (Photo Credits: Facebook)

मालाडच्या (Malad) मालवणी (Malwani) परिसरात एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही घटना शुक्रवारी घडली आहे. मृत व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली सुसाईड पोलिसांना सापडली आहे. ज्यात त्याने कर्जदाराच्या छळाला वैतागून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार, पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, इसराल खान असे मृत व्यक्तीचे नाव आहे. इसरालने शुक्रवारी रात्री उशिरा त्याच्या राहत्या इमारतीच्या टेरेसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार स्थानिकांना समजताच त्यांनी मालवणी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी इसराल याला ताबडतोब कांदिवलीच्या भगवती रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हे देखील वाचा- Maharashtra Bandh: ठाण्यात ऑटोचालकांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून लाठ्यांनी मारहाण; वाहतूक थांबण्यास दबाव (Watch Video)

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी इसरालने लिहलेली सुसाईट नोट सापडली. ज्यात कर्जदाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार, पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृत व्यक्तीला आरोपींना 9 लाख 50 हजारांचे कर्ज द्यायचे होते, असे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.