उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्त महाराष्ट्रामध्ये आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या बंदला पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे. आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दिसत आहे की ठाण्यात ऑटोचालकांना मारहाण करण्यात आली आहे. हा व्हिडिओ ठाण्यामधील असून, या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ऑटोरिक्षा चालकांना लाठ्यांनी मारहाण करत वाहतूक थाब्म्ब्वण्यास सांगितले आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)