प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

मुंबईतील मालाड (Malad) मधील अक्सा बीचवर (Aksa Beach) एका तरुण महिलेचा मृतदेह गुरुवारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेचा मृतदेहाचे विघटन करण्यात आले असून पोलिसंकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. तर मृतदेह हा बंदुकीच्या पिशवीत सापडला असून तो गेल्या 3-4 दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र तरुण महिलेचे अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र कांदिवली ईस्ट मधून गेल्या महिन्यात बेपत्ता झालेली हिच महिला आहे का त्या बद्दल ही अधिक शोध घेतला जात आहे.(Nalasopara: मुंबईमध्ये हेड कॉन्स्टेबलची पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या; सर्व्हिस रिवॉल्व्हरने स्वत:वर झाडली गोळी)

गुरुवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास मालवणी पोलिसांना एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह अक्सा बीचवर आढळून आल्याची माहिती देण्यात आली. तरुण महिलेचे वय 20 च्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. महिलेचा मृतदेह हा त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी असे म्हटले की, महिलेच्या डाव्या हातावर टॅटू असून तिच्या बद्दल अधिक तपास करण्यास मदत होईल. तिने लाल मण्यांचा एक नेकलेस आणि मंगळसुत्र ही घातल्याचे सांगण्यात आले आहे.

सदर महिलेचा चेहरा अत्यंत विद्रुप अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवण्यासाठी काही वेळ लागू शकतो. तर अक्सा बीचवर महिलेच्या मृतदेहाची बॅग ही एखाद्याने तेथे फेकून दिली आहे की तरंगत आली हे स्पष्ट झालेले नाही. हत्या झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.(Pune Murder Case: कर्जदारांपासून सुटका मिळण्यासाठी स्वत: च्या मृत्यूचं नाटक रचून आरोपीने केली मित्राची हत्या; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण)

तर पोलिसांकडून 20 च्या दरम्यान आणखी अन्य पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली होती का याचा तपास करत आहेत. तर समता नगर येथे 8 डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याची एक तक्रार करण्यात आली होती.