मुंबई: आसनगाव येथे धावत्या एक्स्प्रेसखाली सापडूनही प्रवासी सुखरुप ( Viral Video)
Express Train (Photo Credits: Youtube)

मुंबईतील (Mumbai) आसनगाव (Asangaon) रेल्वे स्थानकात एक आश्चर्यकारक आणि थरारकर प्रकार पाहायला मिळाला. रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी शॉर्टकट मारणारा एक व्यक्ती धावत्या एक्स्प्रेसखाली येऊनही बचावला आहे. रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी हा व्यक्ती ट्रॅकवर उतरला. तितक्यात भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत असल्याचे त्याने पाहिले त्यानंतर तो प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेसच्या मध्ये असलेल्या जागेत बसून राहिला. एक्स्प्रेस जाताच तो उठला आणि ट्रॅक क्रॉस करु लागला. या दरम्यान प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. ते पुढे येऊन पाहतात तर काय? संबंधित व्यक्ती सुखरुप होता. (रेल्वेखाली गेलेली एक वर्षाची चिमुरडी सुदैवाने वाचली, व्हिडिओ व्हायरल)

प्लॅटफॉर्मवरील एका प्रवाशाने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (व्हिडिओ: चमत्कारच! अख्खी ट्रेन अंगावर उभी राहिली तरी, रुळावर पडलेली महिला जिवंत)

पहा व्हिडिओ:

 

ही व्यक्ती जरी सुखरुप बचावली असली तरी प्रवाशांनी अशा प्रकारे जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.