रेल्वेखाली गेलेली एक वर्षाची चिमुरडी सुदैवाने वाचली, व्हिडिओ व्हायरल
रेल्वे अपघात ( फोटो सौजन्य- ANI )

उत्तर प्रदेशात मथुरा रेल्वे स्थानकावर एक वर्षाची चिमुरडी रेल्वेखाली पडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. मात्र या घटनेतील चिमुरडीचा जीव वाचल्याने रेल्वे स्थानकावरील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मथुरा रेल्वे स्थानकावरुन रेल्वे येणार असल्याची घोषणा झाली होती. तसेच प्लॅटफॉर्मवर खेळत असलेली चिमुरडी खेळताखेळता रेल्वेरुळावर पडली. या घटनेने तेथे उपस्थित असलेली मंडळी घाबरुन गेली. परंतु तिला वाचवण्याची कोणाही पुढे आले नाही. रेल्वेखाली गेलेल्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ती सुखरुप असल्याचे प्लॅटफॉर्मवरील लोकांना वाटले. त्यानंतर रेल्वे पुढे निघुन गेल्यावर या चिमुरडीला वर काढण्यात आले.

मात्र या घटनेतील चिमुरडी सुदैवाने वाचली असून तिला जरासुद्धा खरचटले नाही. यामुळे तिच्या पालकांनी तिला आपल्याकडे घेत त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले पाहायला मिळाले.