मुंबईतील मध्य रेल्वे लाईनवर टिटवाळा-सीएसटी मार्गावर आज लोकलच्या गार्डचा डब्बा घसरला. मध्य रेल्वेवरील टिटवाळा सीएसटी लोकलच्या गार्डचा डब्बा रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. डब्बा घसरल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डब्बा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईकरांची जीवनवाहिनी, चाकरमान्यांची दररोजची सोबती म्हणजे मुंबईची लोकल. लाखो मुंबईकर लोकलने दररोज प्रवास करतात. (हेही वाचा - CBTC System for Mumbai Local: मुंबई आणि उपनगरीय रेल्वे सेवा दुप्पट करण्यासाठी प्रतमच सीबीटीसी कवच प्रणालीचा वापर, लोकल ट्रेनवर काय होणार परिणाम? घ्या जाणून )
कल्याण रेल्वे स्टेशनवर प्लॅट फर्म नंबर दोनवर ही घटना घडली, त्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी व आरपीएफ जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रेन रुळावरुन खाली आल्याने प्रवाशांमध्ये काही वेळ भितीचे वातावरण पहायला मिळाले.
पाहा पोस्ट -
#BREAKING-- Mumbai CSMT bound local train derails at Kalyan station, platform 2. No injuries to anyone. Pic 2 credit @UmredkarBhupen pic.twitter.com/zZwPRB8Gat
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) October 18, 2024
लोकल ट्रेनच्या गार्डचा डब्बा रुळावरून घसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी तातडीने गेले. त्यांनी तातडीने डब्बा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. ऐन घरी जाण्याच्या वेळी ही घटना घडली. या घटनेमुळे लोकांना मोठा मनस्ताप हा सहन करावा लागला. सध्या रेल्वे डब्बा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू असून या मार्गावर वाहुतकीला अडथळा निर्माण झाला आहे.