मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल (Mumbai Local) वर आज मध्य (Central) आणि हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) आहे. आज रविवार 13 नोव्हेंबर दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रूळ, सिग्नल यंत्रणा यांच्यासह काही दुरूस्ती आणि देखभालीची कामं हाती घेण्यात आल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज प्रवास करणार असाल तर रेल्वेचं मेगा ब्लॉकचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा अन्यथा मोठ्या गैरसोईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
मुंबई लोकलच्या मध्य मार्गावर आज माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक आहे. सकाळी 11 वाजून 5 मिनिटं ते संध्याकाळी 3 वाजून 55 मिनिटं या काळात हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी वरून 10.25 ते 3.35 या वेळेत धावणार्या फास्ट लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन स्लो लाईन वर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे जाणार्या फास्ट ट्रेन्स पुन्हा डाऊन फास्ट लाईन वर वळवल्या जातील. तर ठाण्यावरून सुटणार्या अप फास्ट लोकल 10.56 ते 3.46 दरम्यान मुलुंड-माटूंगा मध्ये अप स्लो मार्गावर चालवल्या जाणार आहेत. नक्की वाचा: Mumbai Local Update: ब्रिटीशकालीन कारनाक पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेकडून 19 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 27 तासांचा ब्लॉक जाहीर .
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 11.05 ते 4.05 दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये बेलापूर/नेरूळ-खारकोपर या ट्रेनच्या सेवा अविस्कळीत होणार नाहीत. तर पनवेल- बेलापूर, सीएसएमटी/गोरेगाव या लोकल 10.33 ते 3.49 आणि सीएसएमटी-पनवेल/बेलापूर या 9.45 ते 3.12 दरम्यानच्या लोकल रद्द असणार आहेत. पनवेल-ठाणे 11.02 ते 3.53 आणि ठाणे-पनवेल 10.01 ते 3.20 दरम्यानच्या लोकल देखील रद्द असणार आहेत.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी भागावर विशेष ट्रेन्स चालवल्या जातील. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.