Rainfall | Image used for Representational purpose only | (Photo Credits: PTI)

Mumbai Weather Prediction: प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना (Mumbai) पुढील 24 तासात थोडा उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. स्कायमेटने (Skymet Weather)  वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासामध्ये मुंबईत अवकाळी पावसाचा (Mumbai Rain) शिडकावा होण्याची शक्यता आहे. वातावरण किमान 1-2 अंशाने खालावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शनिवार, 13 एप्रिल दिवशी रात्री कोकणासह मुंबईमध्ये पावसाचा शिडकावा झाला होता. रत्नागिरी, चिपळूण या कोकणपट्ट्यामध्ये काही ठिकाणी गारा पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा; यावर्षी समाधानकारक पाऊस, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

MI Vs RCB सामन्यावर पावसाचं सावट नाही 

मुंबईमध्ये आज रात्री उशिरा पाऊस पडण्याची शक्यता आहे.मात्र या पावसाचे सावट संध्याकाळी वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या मुंबई विरूद्ध बेंगलोर या सामन्यावर नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

यंदा पाऊस वेळेत दाखल होणार असून तो पुरेसा पडणार असल्याचा अंदाजही स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या हवामानात बदल झाला तरीही उकाडा कायम राहिल असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.