Leopard Cub Rescued Rrom Aarey Colony: स्थानिकांच्या मदतीने भर पावसात मुंबईत रस्त्यावर भरकटलेल्या बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका
Leopard Cub | Twitter/ AareyForest

बिबट्याचा बछडा (Leopard Cub) मुंबई (Mumbai) मध्ये काल (28 सप्टेंबर) काल पावसात भिजून रस्त्यावर फिरताना दिसलं. हा बछडा आरे कॉलनी परिसरात आढळला आहे. दरम्यान आईपासून दुरावलेला आणि पावसात भिजल्याने बिथरलेल्या अवस्थेतील बिबट्याचा बछडा निवारा शोधत होता. त्याच्या शरीरावर माती, चिखल लागलेल्या अवस्थेत पाहून काही वन्य प्रेमींनी त्याची सुटका केली. त्याची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान सोशल मीडीयात प्रसिद्ध झालेल्या काही फोटोंमध्ये अ‍ॅनिमल रेस्क्यु स्टाफ कडून हा बछडा एका ब्लॅंकेट मध्ये गुंडाळलेला पाहायला मिळाला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार काही पोलिस दलातील लोकांनी देखील मदतीचा हात पुढे केला. रेस्क्यू टीम सोबत त्यांनी देखील समन्वय ठेवण्याचं काम केले. दरम्यान हा बछडा अवघ्या 45 दिवसांचा आहे. सध्या त्याला संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आलं आहे. नक्की वाचा: Leopard Attack in Aarey Colony: मुंबईत आरे कॉलनी परिसरात सतर्क नागरिकांमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला 4 वर्षीय चिमुकला.

आरेच्या जंगल परिसरात रस्त्यावर बिबट्याचा बछडा 

मुंबई मध्ये आरेचं जंगल हे महाविकास आघाडी सरकार कडून काही महिन्यांपूर्वीच आरक्षित जंगल म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये अनेक जातीचे पक्षी, प्राणी पहायला मिळतात. दरम्यान मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 600 एकर जागा ही आरे जंगल म्हणुन घोषित करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी आरे जंगल मध्ये मेट्रोचं कार शेड बनवण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणवादी यांच्यामध्ये तीव्र संघर्ष पेटला होता. यामध्ये 2700 झाडांची कत्तल होणार होती. मागील काही दिवसांत मानवी वसाहतींमध्ये आता बिबट्यांचा वावर वाढला असल्याचं सर्सास पहायला मिळत आहे.