कांदिवली येथे रिक्षात बसलेल्या महिलेसमोर अश्लील चाळे, रिक्षाचालकाला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कांदिवली (Kandivali) येथे एका रिक्षात बसलेल्या महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. तर महिलेने चालकाचे हे गैर कृत्य पाहून ट्वीट करत पोलिसांना याबद्दल कळवले. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

आज एका महिला कांदिवली येथील पश्चिमेकडून महात्मा गांधी मार्गावरुन रिक्षा पकडली. त्यावेळी रिक्षातून काही अंतर पुढे गेल्यावर चालकाने महिलेच्या समोर आरशामधून तिच्याकडे पाहत अश्लील चाळे करु लागला. याबद्दल महिलेला कळताच तिने लगेच ट्वीट करत चालकाच्या या कृत्याबद्दल पोलिसांना कळवले. या प्रकारावर पोलिसांनी सदर पीडित महिलेचे घर गाठत घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही पाहिले.(ठाणे : लोकलच्या लेडीज कोच मध्ये तरुणींसमोर अल्पवयीन मुलाने केले हस्तमैथुन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यांना महिलेने सांगितलेल्या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली. तर दोन दिवसांपूर्वी ठाणे लोकलमध्ये महिलांच्या डब्यात एका मुलाने हस्तमैथून केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी सुद्धा महिलेने ट्वीट करत त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियात पोस्ट केला.