ठाणे : लोकलच्या लेडीज कोच मध्ये तरुणींसमोर अल्पवयीन मुलाने केले हस्तमैथुन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Young Boy Mastrubates In Ladies Comapartment (Photo Credits: Twitter)

28 जुलै 2019: ठाणे (Thane) स्थाकातून सुटणाऱ्या लोकलमधील महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगात एका अल्पवयीन मुलाने महिला प्रवाशांसमोर हस्तमैथुन (Mastrubation) केल्याचे समजत आहे. संबंधित डब्यातून प्रवास करणाऱ्या येन्ड्रीला सेनगुप्ता (Yendrila Sentgupata) नामक एका तरुणीने या घटनेचा व्हिडीओ काढून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला ज्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला.

येन्ड्रीला या तरुणीने आपल्या ट्विट मध्ये म्हटल्यानुसार, तिने सकाळी ठाणे स्थानकटाऊन सुटणारी 6  वाजून 32 मिनिटांची ट्रेन पकडली होती, काहीवेळाने या महिलांच्या कोच मध्ये एक अल्पवयीन मुलगा चढला, त्याचे वय बघता कोणीही त्याला थांबवले सुद्धा नाही, हा मुलगा दारापाशी बसला होता, पण काही वेळाने या मुलाने असे काही केले त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता, लाझन म्हणून जागा दिलेला हा मुलगा चक्क प्रवासी महिलांकडे बघून हस्तमैथुन करू लागला. यानंतर सर्व महिलांनी त्याला डब्यातून खाली उतरण्यास सांगितले पण तो काहीही प्रतिसाद न देता आपला हा किळसवाणा प्रकार करत राहिला, शेवटी त्याला महिलांनी अक्षरशः धक्के मारून ट्रेनमधून उतरवले.

पहा या मुलाचा व्हायरल व्हिडीओ

जर का तुम्ही व्हिडीओ मध्ये पहिले असेल तर हा मुलगा थेट कॅमेरात बघताना पाहायला मिळत आहे, यावरून त्याला आपले शूटिंग केले जात आहे हे नक्कीच समजले असणार मात्र कशालाही न घाबरता त्याने आपला कोडगेपणा सोडला नाही.

दरम्यान , लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक पावलं उचलली जातात, ज्या अंतर्गत आपत्कालीन क्रमांक, रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त असे अनेक प्रकार प्रशासन आजमावून पाहत असते, पण असं असलं तरी दिवसागणिक सुरक्षेचा प्रश्न सुटण्यपेक्षा अधिकच गंभीर होत आहे.