मुंबईतील (Mumbai) जुहू बीचवर (Juhu Beach) 'ब्लू बॉटल्स' जेली फिश आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांना याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. ब्लू बॉटल्स जेली फिश हे एका ठरविका मोसमात समुद्राच्या किनाऱ्यालगत येतात. तसेच हे जेली फिश अतिशय विषारी असून त्यांचा दंश व्यक्तीला झाल्यास खुप त्रास होते. काही वेळेस व्यक्ती मृत्यूमुखी सुद्धा पडू शकतो.
समुद्रात साधारण तीन प्रकारचे जेली फिश आढळून येतात. पावसाळा सुरु होण्यापूर्वी 'ब्लू बटन', पावसाळ्यात 'ब्लू बॉटल्स' आणि पावसाळा संपल्यानंतर' बॉक्स' जेली फिश असे विविध प्रजातीच्या जेली फिश दिसून येतात. ब्लु बॉटल्स जेली फिश हे दोन इंच आकाराचे असून त्यांचे शरीर निळ्या रंगाच्या फुग्यासारखे असते. तसेच सात इंच लांब पातळ दोरीसारखे त्यांचे पाय असतात. हे जेली फिश लांबून पाहिल्यास प्लास्टिकच्या बॉटल्स प्रमाणे दिसून येतात. परंतु जवळून पाहिल्यास ते जेली फिश प्रजातीमधील असल्याचे लक्षात येते.(मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव देखील भरलं; एकूण पाणीसाठा 85.68 %)
पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीकडे वारे प्रचंड वेगाने वाहत असतात. यामुळे वजनाने हलके असलेले जेलीफिश समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर येतात. तर ब्लू बॉटल्स जेली फिश हा अत्यंत विषारी असल्याचे म्हटले जाते. यापूर्वी सुद्धा जेली फिश मुंबईच्या किनाऱ्यावर दिसून आल्याने नागरिक घाबरले होते.