प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-File Image)

मुंबई (Mumbai) येथील घाटकोपर (Ghatkopar) मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी रिक्षातून येत एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्याचा प्रकार दुपारी घडला आहे. परंतु या घटनेमागील कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचसोबत मृत व्यक्तीची सुद्धा ओळख पटली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वोदय हॉस्पिटलच्या परिसरात गोळीबार रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. तर एक व्यक्ती एसयुव्ही कारच्या बाहेर उभी असताना रिक्षातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर तीन राउंडमध्ये गोळ्या झाडल्या. तसेच या व्यक्तींनी आपली ओखळ पटू नये म्हणून तोंडाला मास्क लावला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यामध्ये गोळी झाडण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(घाटकोपर: जागृतीनगर मेट्रो स्टेशनजवळ दिवसाढवळ्या सुरा खुपसून एका व्यक्तीचा खून)

या प्रकरणी जखमी झालेल्या व्यक्तीला राजावाडी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. परंतु स्थानिक पोलिसांकडून याबद्दल अधिक तपास केले जात असल्याचे सांगितले जात आहे.