
घाटकोपर येथील जागृती नगर मेट्रो स्टेशन परिसरात आज सकाळी 11.30 वाजता तीन अज्ञातांनी एका 40 वर्षीय व्यक्तीवर चाकूहल्ला केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बबलू दुबे अॅलिस चोटी (Babloo Dubey) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या हल्ल्यानंतर त्याला जवळच्या स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दुबे यांच्यावर मर्डरसह अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुन्हे दाखल आहेत. टिळकनगर, घाटकोपर, पंतनगर परिसरामधील पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. मुंबई: घाटकोपर येथे रिक्षातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार, एकाचा मृत्यू
घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये खूनाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूर्व वैमन्यस्यातून हा खून झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत असल्याचं पोलिसांनी सांग़ितलं आहे.