गणेशोत्सवावेळी रेल्वे मार्गावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष राहणार, सुरक्षा बलाच्यावतीने 'ऑपरेशन क्यू' राबवणार
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

गणेशोत्सवाचा सण (Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात गर्दी रेल्वेस्थानकात करतात. या दरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून रेल्वे मार्गावरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार सुरक्षा बलाच्या वतीने ऑपरेशन क्यू राबण्यात येणार आहे.

मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर खासकरुन सुरक्षा बलाची करडी नजर असणार आहे. गणशोत्सवावेळी कोकणात जाण्यासाठी जादा गाड्यांची सोय केली जाते. तरीही प्रवाशांची गर्दी होती. मात्र यंदा कोकणात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मार्गदर्शन करण्यासाठी सुरक्षा बलाकडून मदत केली जाणार आहे. तसेच रेल्वे स्थानकावरील पुल आणि रेल्वेमधून चढताना किंवा उतरताना डाव्या बाजूने उतरावे असे आवाहन प्रवाशांना करण्यात येणार आहे.(मुंबई: गणेशोत्सव 2019 च्या मिरवणूकांदरम्यान कमजोर पुलांवर नाचणं टाळा; प्रशासनाचं गणेशभक्तांना आवाहन)

तसेच मोदी सरकराने कलम 370 रद्द केल्यानंतर देशातील सर्व ठिकाणी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. त्यावेळ पासून बकरी इद, स्वातंत्र्य दिना दिवशीसुद्धा सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. यामुळेच आता गणेशोत्सवावेळी सुद्धा कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून आधीपासून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.