मुंबईतील नागरिकांना प्रवासासाठी खोटे इ-पास बनवणाऱ्या चार जणांना पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी नागरिकांना मुंबई आणि मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या नागरिकांना खोटे इ-पास बनवून देत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या चार पैकी तीन जण हे टूर ऑपरेटर्स आहेत. तर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून यांच्याकडे काम नसल्याने सोप्या मार्गाने पैसा कमावण्यासाठी खोटे इ-पास बनवण्यास सुरुवात केली. इ-पास बनवण्यासाठी हे लोक नागरिकांनाकडून जवळजवळ 2-5 हजार रुपये वसूल करत.
नागरिकांनी प्रवासासाठी कार बुकिंग केल्यानंतर हे लोक त्यांना आम्ही इ-पास ही बनवून देतो असे सांगायचे. ऐवढेच नाही तर इ-पास बनवण्यासाठी आमची पोलीस खात्यामध्ये ही ओळख असल्याचे सांगायचे. अब्दुल करिम मोहम्मग शेख अलिस अस्लम (मालवण), समिर श्यामसुधन खान, नुर मोहम्मद अब्दुल गानी शेख (मुंबई) आणि विनय पत्रे अशी आरोपींची नावे आहेत.(COVID-19: कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिक पैसे उकळत असल्याने एका खाजगी रुग्णालयाचा परवाना निंलबित; ठाणे शहरातील नागरी संस्थेची कारवाई)
पोलिसांनी असे म्हटले आहे की, अस्लम, खान आणि शेख हे टूर ऑपरेटर्स असून त्यांच्याकडील कार भाड्याने देत. वसईतील पत्रे हा डीटीपी ऑपरेटर आहे. हे सर्वजण खासकरुन मुंबई बाहेर जाणाऱ्या नागरिकांना टार्गेट करायचे. या आरोपींनी जवळजवळ 1 हजार खोट्या इ-पासची विक्री केल्याचे ही पोलिसांनी पुढे म्हटले आहे. मुंबई पोलीस आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या खोट्या इ-पासच्या प्रिंट आउट ही जप्त करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी असे ही म्हटले की, ही लोक कंप्युटरवर इ-पास वरील नावे आणि पत्ता बदलून नागरिकांना ते नवे पास असल्याचे सांगुन देत होते.(राज्यात COVID-19 रुग्णावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 15 जणांना अटक)
कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना इ-पासची आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र इ-पासचा काळाबाजार होत असल्याची प्रकरणे यापूर्वी सुद्धा समोर आली आहेत. याआधी मुंबई गुन्हे शाखेने घाटकोपर येथून खोटे इ-पास देणाऱ्या टोळीवर धाड टाकत अटक केली होती.