COVID-19: कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिक पैसे उकळत असल्याने एका खाजगी रुग्णालयाचा परवाना निंलबित; ठाणे शहरातील नागरी संस्थेची कारवाई
प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या व शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करावा अशा सूचनाही दिल्या आहेत. मात्र, कोविड19 वर्गीकरण कक्षाच्या नावाखाली एका खाजगी रुग्णालयाने रुग्णांकडून अधिक पैसे आकरले म्हणून ठाणे (Thane) शहरातील नागरी संस्थेकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित रुग्णालयातील वर्गीकरण कक्ष रद्द केले असून रुग्णालयाचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिक पैसे अधिक पैसे घेत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच महाराष्ट्रातील ठाणे शहरातील नागरी संस्थेने शनिवारी उपचारासाठी घोडबंदर रोडवरील खासगी रुग्णालयाचे वर्गीकरण रद्द केले आणि त्याचा परवाना एका महिन्यासाठी निलंबित केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ऑडिट टीमने 12 जुलैपर्यंत रुग्णालयात उपचार घेतलेल्या 797 रुग्णांपैकी 56 जणांकडून सहा लाखांहून अधिक पैसे आकारले गेल्याचे समोर आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Update: महाराष्ट्रात 'या' वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण; महिलांपेक्षा पुरुष कोरोनाबाधितांची संख्या अधिक

पीटीआयचे ट्वीट-

दरम्यान, रुग्णांकडून अधिक पैसे आकरत असलेल्या खाजगी रुग्णालयांविरोधात मोहीम सुरुच राहणार असून इतर प्रकरणांमध्येही अशीच कारवाई केली जाणार आहे, असे ठाणे महानगरपालिका उप आयुक्त संदीप मालवी म्हणाले आहेत.