
Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात 9 हजार 615 नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजत आहे. यानुसार राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 117 वर पोहोचली आहे. दुसरीकडे कालच्या दिवसात 5 हजार 714 जणांनी कोरोनावर मात केली आहे यानुसार आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुर्दैवाने आतापर्यंत 13 हजार 132 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) तर्फे दररोज या रुग्णांच्या आकडेवारी सह वैद्यकीय अहवाल मांडला जातो. यातील ताज्या अपडेटनुसार, आठवड्याभरातील कोरोना रुग्णांची वयोगटानुसार व लिंगनिहाय आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाची लागण होण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय 31 ते 40 वयवर्षाचा गट हा कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहे.
कोरोनामुळे 60 च्या वरील वयोगटातील नागरिकांना सर्वाधिक धोका आहे असे सांगितले जाते. मात्र वास्तविक रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास 31 ते 40 वर्ष , 41 ते 50 वर्ष आणि 21 ते 30 वर्ष या गटात अधिक कोरोना पसरल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात असणाऱ्या कोरोना रुग्णांची वयोमानानुसार आकडेवारी जाणून घेण्यासाठी हा तक्ता पहा
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची वयानुसार आकडेवारी
क्र. | वय वर्ष | कोरोना रुग्णसंंख्या | टक्केवारी |
1 | 0-10 | 13,463 | 3.88 |
2 | 11-20 वर्ष | 23,803 | 6.87 |
3 | 21-30 वर्ष | 61,361 | 17.71 |
4 | 31-40 वर्ष | 71,196 | 20.54 |
5 | 41-50 वर्ष | 62,008 | 17.89 |
6 | 51-60 वर्ष | 57,757 | 17.67 |
7 | 61-70 वर्ष | 36,071 | 10.41 |
8 | 71-80 वर्ष | 15,908 | 4.59 |
9 | 81-90 वर्ष | 4465 | 1.29 |
10 | 91-100 वर्ष | 538 | 0.16 |
11 | 101-110 वर्ष | 1 | 0.00 |
एकुण | 3,46, 571 | 100.00 |
कोरोनाचा लिंगनिहाय रुग्ण तक्ता पाहिल्यास, पुरुषांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण 61टक्के आहे तर महिलांमध्ये हेच प्रमाण अवघे 39 टक्के आहे. कोरोना मृतांच्या बाबतही पुरुषांमध्ये मृतांचे प्रमाण 65 टक्के आहे तर महिलांमध्ये कोरोना मृतांचा टक्का अवघा 35 इतकाच आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची लिंगनिहाय आकडेवारी

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने आता 13 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 48,916 रुग्ण आढळले आहेत तर 757 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 31,358 मृत्यू झाले आहे. तसेच एकूण 8,49,432 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.