Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात 9 हजार 615 नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजत आहे. यानुसार राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 117 वर पोहोचली आहे. दुसरीकडे कालच्या दिवसात 5 हजार 714 जणांनी कोरोनावर मात केली आहे यानुसार आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुर्दैवाने आतापर्यंत 13 हजार 132 जणांची कोरोना विरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. यात सुरुवातीपासून मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे. कल्याण- डोंबिवली, भिवंडी, पालघर, औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा कोरोना झपाट्याने पसरत आहे. या सर्व जिल्ह्यातील व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आज पर्यंतची आकडेवारी जाणून घ्या.

महाराष्ट्र पोलिस दलातील तब्बल 8,232 पोलिसांना Covid-19 ची लागण तर 93 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा मनपा निहाय आकडेवारी

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1,06,980 5984
2 ठाणे 11,842 247
3 ठाणे मनपा 18,609 647
4 नवी मुंबई मनपा 14,495 385
5 कल्याण डोंबिवली मनपा 20,249 356
6 उल्हासनगर मनपा 6516 121
7 भिवंडी निजामपूर मनपा 3604 238
8 मीरा भाईंदर 7874 255
9 पालघर 2858 37
10 वसई विरार मनपा 10,685 252
11 रायगड 7523 132
12 पनवेल मनपा 6082 125
ठाणे मंडळ एकूण 2,17,317 8779
1 नाशिक 2891 99
2 नाशिक मनपा 7546 222
3 मालेगाव मनपा 1303 88
4 अहमदनगर 1428 34
5 अहमदनगर मनपा 1146 14
6 धुळे 1991 47
7 धुळे मनपा 1096 41
8 जळगाव 6594 366
9 जळगाव मनपा 2152 86
10 नंदुरबार 491 21
नाशिक मंडळ एकूण 25,838 1018
1 पुणे 7206 182
2 पुणे मनपा 47,457 1203
3 पिंप्री-चिंचवड मनपा 15,256 281
4 सोलापूर 2783 69
5 सोलापूर मनपा 4468 354
6 सातारा 2862 96
पुणे मंडळ एकुण 80,032 2185
1 कोल्हापूर 2795 45
2 कोल्हापूर मनपा 418 19
3 सांगली 758 26
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 472 16
5 सिंधुदुर्ग 306 5
6 रत्नागिरी 1428 49
कोल्हापूर मंडळ एकुण 6177 160
1 औरंगाबाद 2853 49
2 औरंगाबाद मनप 8393 382
3 जालना 1610 64
4 हिंगोली 499 9
5 परभणी 261 12
6 परभणी मनपा 159 5
औरंगाबाद मंडळ एकूण 13,775 521
1 लातूर 791 47
2 लातूर मनपा 567 23
3 उस्मानाबाद 619 33
4 बीड 478 14
5 नांदेड 499 19
6 नांदेड मनपा 643 31
लातूर मंडळ एकूण 3597 167
1 अकोला 669 30
2 अकोला मनपा 1620 73
3 अमरावती 257 13
4 अमवरावती मनपा 1296 37
5 यवतमाळ 691 23
6 बुलढाणा 905 25
7 वाशीम 449 9
अकोला मंडळ एकूण 5887 210
1 नागपूर 695 4
2 नागपूर मनपा 2433 34
3 वर्धा 104 2
4 भंडारा 200 2
5 गोंदिया 233 3
6 चंद्रपूर 213 0
7 चंद्रपूर मनपा 78 0
8 गडचिरोली 221 1
नागपूर मंडळ एकूण 4177 48
1 इतर राज्य 317 44
एकूण 3,57,117 13,132

दरम्यान, देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 48,916 रुग्ण आढळले आहेत तर 757 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 13 लाख 36 हजार 861 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 31,358 मृत्यू झाले आहे. तसेच एकूण 8,49,432 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.