AC Double Decor bus

मुंबईत पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस ( electric AC double-decker bus) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) दरम्यान सुरु करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील प्रवाशांना पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईची (Mumbai)  दुसरी लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या बेस्ट (BEST) बसच्या ताफ्यात इलेक्ट्रीक डबल डेकर बसचा समावेश करण्यात आला होता. बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बस जुन्या झाल्याने नव्या बसच्या पर्यायांवर विचार सुरू करण्यात आला होता. त्यानंतर आता एसी डबलडेकर (AC double-decker) बसचा समावेश बेस्टने आपल्या ताफ्यात केला आहे.

वातुनूकुलीत सेवेसोबतच या बसमध्ये डिजिटल टॅप इन – टॅप आऊट तिकीट बुकिंगची व्यवस्था दिली आहे. जे लोक बेस्टचे चलो कार्ड किंवा चलो अॅप वापरतात. त्यांना कंडक्टरशिवाय स्वतःहूनच तिकीट काढता येणार आहे. एसी डबल डेकर बसमध्ये ६५ प्रवाशांसाठी आसन क्षमता आहे. दोन्ही बाजूला दरवाजे असल्यामुळे जुन्या डबल डेकर बसमध्ये एकाच दरवाजात जी गर्दी व्हायची ती यात होणार नाही.

या बसचे पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे पहिलाय पाच किमींसाठी फक्त ६ रुपये एवढंच आहे. सध्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसमध्ये जो तिकीट दर आहे, तोच दर डबलडेकरसाठी ठेवण्यात आला आहे.  बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी सांगितले की, आगामी आर्थिक वर्षात मुंबईत ४ हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे नियोजन आहे. ज्यामध्ये २०० एसी डबल डेकर बस असणार आहेत.