Drugs Case: 'राष्ट्रीय वाहिनी'च्या एका रिपोर्टरला मुंबईकर पत्रकारांनी फटकावले
Tv Media | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

विचित्र हावभावांसह वार्तांकणासाठी प्रसिद्ध असलेल्या मुख्य अँकरच्या एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मुंबईकर पत्रकारांनी फटकावल्याचे वृत्त आहे. ही घटना एका हायप्रोफाईल ड्रग्ज प्रकरणाचे (Drugs Case) वार्तांकन करत असताना घडली. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) (NCB) मुंबई (Mumbai ) येथील एका गेस्ट हाऊसमध्ये संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहे. या चौकशीला सामोरे जाण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी आणि महत्त्वाचे लोक येत आहेत. दरम्यान, या वेळी वार्तांक करत असताना या पत्रकाराने वार्तांकनादरम्यान स्थानिक वार्ताहरांना 'चाय बिस्कुट वाले पत्रकार' असे संबोधले. या वेळी प्रादेशीक (स्थानिक) पत्रकारांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या पत्रकारास फटकावले.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई येथील कुलाबा गेस्ट हाऊस बाहेर सकाळी 10 वाजता ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गेस्टहाऊसमध्येच एनसीबीचे पथक थांबले आहे. अंमली पदार्थ प्रकरणी आपली जबाब नोंदवण्यासाठी बॉलिवूडचे अनेक लोक या ठिकाणी दाखल होत आहेत. अशा वेळी सेलिब्रेटींची प्रतिक्रिया घेण्यासाठी वृत्तवाहिन्यांच्या पत्रकांराची या ठिकाणी झुंबड उडते. गुरुवारीही अशीच झुंबड उडाली. या वेळी संबंधित पत्रकार आणि मुंबईतील इतर पत्रकारांमध्ये झटापट झाली. (हेही वाचा, Journalist Shirish Date: भारतीय वंशाचे पत्रकार शिरीष दाते यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला विचारला 'हा' प्रश्न; राष्ट्राध्यक्ष म्हणाले 'पुढचा प्रश्न')

प्राप्त माहितीनुसार, ज्या पत्रकाराला फटकावण्यात आले आहे हा पत्रकार संबंधित ड्रग्ज प्रकरणाचे वार्तांकन करण्यासठी दिल्लीवरुन मुंबईत आला आहे. हा पत्रकार वार्तंकन करताना इतर वाहिन्यांच्या फ्रेममध्ये येत होता. या वेळी या पत्रकारास फ्रेममधून हटण्यास सांगण्यात आले. त्या वेळी या पत्रकारने इतर पत्रकारांना उद्देशून अपशब्द काढले. या पत्रकाराने स्थानिक पत्रकारांना उद्देशून 'चाय-बिस्कुट खाणारे गरीब पत्रकार,' 'अवसाद वाले पत्रकार' असे शब्द वापरले. त्यानंतर इतर पत्रकारांनी त्याला फटकावले.

दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, या राष्ट्रीय वाहिणीच्या पत्रकाराला स्थानिक पत्रकारांनी कानशिलात लगावली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत हातापाईवर उतरलेल्या पत्रकारांना बाजूला केले. त्यामळे पुढील वाद आणि अनर्थ तुर्तास तरी टळला.