DIG Nishikant More Suspend | (Photo Credit: Archived, edited, representative images)

वाहतूक विभागातील पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे (DIG Nishikant More) यांना पदावरुन निलंबित (DIG Nishikant More Suspend) करण्यात आले आहे. राज्याच्या गृह विभागाने ही कारवाई केली. अल्पवयीन तरुणीचा विनयभंग आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा मोरे यांच्यावर आरोप आहे. आजच्या दिवसात या प्रकरणात मोरे यांना बसलेला हा दुसरा झटका आहे. निशिकांत मोरे यांनी पनवेल कोर्याकडे संबंधीत प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, पनवेल कर्टाने त्यांचा जामीन अर्ज आज (9 जानेवारी 2019) फेटाळून लावला. त्यामुळे मोरे यांची अटक आता अटळ ठरली आहे. त्यातच मोरे यांच्यावर गृहविभागाने निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे आज दिवसभरात मोरे यांना बसलेला हा दुसरा झटका आहे.

दरम्यान, डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जाणे आणि त्यानंतर काहीच वेळात त्यांचे निलंबन होणे यावरुन हे प्रकरण आता बरेच गंभीर रुप धारण करत असल्याची दिसते. दरम्यान, मोरे यांचा निकटवर्ती असलेल्या दिनकर साळवे यालाही निलंबीत करण्यात आले आहे. दिनकर साळवे हा मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यात वाहन चालक आहे. साळवे याने या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या आरोपावरुन राज्याच्या गृह विभागाने कारवाई करत दिनकर साळवे याला निलंबीत केले आहे. (हेही वाचा, मुंबई: DIG निशिकांत मोरे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावणार्‍या तरूणीला उद्धव ठाकरे यांच्या ड्रायव्हर कडून धमकी; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून वाहनचालक बडतर्फ)

काय आहे प्रकरण?

निशिकांत मोरे हे पुणे वाहतूक विभागात पोलीस उपमहानिरीक्षक पदावर काम करतात. मोरे यांनी एका तरुणीशी अश्लील वर्तन करत तिच्या चेहऱ्याला लावलेला केक चाटण्याचा प्रयत्न केला. तसेच, पीडितेला अवघडल्यासारखे वाटेल असे वर्तन केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार हे प्रकरण जून 2019 मध्ये तळोजा परिसरात घडले होते. पोलीस दलात अगदी वरीष्ट पदावर कार्यरत असल्यामुळे निशिकांत मोरे यांच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात होता. (हेही वाचा, नवी मुंबईः 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस उपमहानिरीक्षकावर POSCO अंतर्गत गुन्हा दाखल; वाचा सविस्तर)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीचा 5 जून या दिवशी वाढदिवस होता. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी घरातच बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीस वाहतूक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिंकात मोरे हे देखील उपस्थित राहिले. उल्लेखनीय असे की, मोरे यांना या पार्टीचे निमंत्रण नव्हते. या पार्टीत मोरे यांनी तरुणीशी अश्लिल वर्तन करत तिच्या चेहऱ्याला लागलेला केक चाटण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पीडितेला अगदीच अवघडल्यासारखे झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. मात्र, मोरे हे पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप होता. अखेर समाजातील विविध स्तरातून दबाब वाढल्यानंतर पोलिसांनी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.