तळोजा (Taloja) भागात राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून पोलिस खात्यातील मोटार परिवहन (एमटी) विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे (Nishikant More) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मोरे यांनी संबंधित मुलीसोबत असलेले वर्तन करण्याच्या आरोपातून तळोजा पोलिसांकडून विनयभंगासह पोक्सो ( कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक ही घटना काही महिन्यांच्या आधी घडली होती यावरून मुलीसहित तिच्या वडिलांनी पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली होती मात्र एका उच्च पदावरील अधिकाऱ्याच्या विरुद्ध आलेल्या या तक्रारीला पोलिसांनी नोंदवून घेण्यास नकार दिला होता. हा प्रकार सोशल मीडियावर येताच अखेरीस मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
Nirbhaya Rape Case: सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली; आरोपी अक्षय सिंह याची फाशी कायम
प्राप्त माहितीनुसार, पुणे एमटी विभागात करतात असणारे पोलीस उप महानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्या मित्राची मुलगी (संबंधित पीडित) हीच यंदा 5 जून रोजी वाढदिवस होता. यावेळी आमंत्रण नसतानाही मोरे आणि कुटुंबीय वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते, तिथे जाऊन केक कापताना मोरे यांनी मुलीला आक्षेपार्ह्य पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केला. हा सर्व वरेकर घडत असताना मोरे यांनी बरेच मद्यपान केले होते असेही मुलीने आपल्या तक्रारीत सांगितले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने आपल्या वडिलांसोबत खारघर आणि तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी सुरुवातील याकडं दुर्लक्ष केले मात्र आता त्यांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
दरम्यान, निशिकांत मोरे यांच्या बाबत सविस्तर तपास झाल्यावर मगच याप्रकरणी निर्णय घेतला जाणार आहे, तत्पूर्वी राज्यातील उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.