
मुंबईतील धारावीत (Dharavi) कोरोनाचे गेल्या महिन्यात 500 रुग्णांची नोंद झाली होती. तिच आकडेवारी आता दोन डिजिटवर आल्याचे दिसून आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच 100 पेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर जुलै 1 या दिवशी धारावीत कोरोनाचे 535 रुग्णांची नोंद झाली होती ती एकूण 2282 रुग्णांच्या 23 टक्के होती. तर 27 जुलै पर्यंत 98 आणि 31 जुलैला 77 रुग्णांची नोंद झाली होती. महापालिकेने असे म्हटले आहे की, या परिसरात 20 पेक्षा कमी आणि महिन्यातील दररोजची कोरोनाची आकडेवारी पाहती ती 9 वर पोहचल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी धारावीत कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जी वॉर्ड म्हणजेच दादर आणि माहिम येथे कोरोनाचे अनुक्रमे 469 आणि 211 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण 1 एप्रिल या दिवशी आढळून आला होता.त्यानंतर मे महिन्याच्या अखेर पर्यंत 946 रुग्णांसह आकडा 1830 वर पोहचला होतो. आता पर्यंत धारावी मध्ये एकूण 253 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच जुलै महिन्यात धारावीत 10 पेक्षा कमी रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळत असल्याचे दिसून येते आहे. त्याचसोबत कोरोनाच्या दुप्पटीचा वेग सुद्धा मंदावला गेला आहे. (Coronavirus Lockdown in Thane: ठाणे जिल्ह्यामध्ये कंटेन्मेंट झोन साठी लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्यंत कायम!)
दरम्यान, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे. तसेच कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने त्यासंदर्भात संशोधन केले जात आहे. तर WHO यांनी कोरोनावरील लस येण्यासाठी पुढचे वर्ष येईल असे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात येत्या 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.