मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे आणखी 13 रुग्ण आढळल्याने आकडा 2573 वर पोहचला, BMC ची माहिती
Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुंबईतील धारावीत  (Dharavi) कोरोनाच्या परिस्थितीवर हळूहळू नियंत्रण आणण्यात यश येत आहे. तर धारावीत कोरोनाबाधितांचा दुप्पटीचा दरासह मृतांच्या आकड्यात ही घट झाल्याचे दिसून आले आहे. याच दरम्यान आता धारावीत आज कोरोनाचे आणखी 13 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2573 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. सध्या धारावीत कोरोनाचे फक्त 80 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दाटीवाटीची लोकवस्ती धारावीत असली तरीही येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते.

जुलै 1 या दिवशी धारावीत कोरोनाचे 535 रुग्णांची नोंद झाली होती ती एकूण 2282 रुग्णांच्या 23 टक्के होती. तर 27 जुलै पर्यंत 98 आणि 31 जुलैला 77 रुग्णांची नोंद झाली होती. महापालिकेने असे म्हटले आहे की, या परिसरात 20 पेक्षा कमी आणि महिन्यातील दररोजची कोरोनाची आकडेवारी पाहती ती 9 वर पोहचल्याचे दिसून आले आहे.(धारावीत जुलै महिन्यात एकाच दिवसात 10 पेक्षा कमी कोरोनाच्या रुग्णांची नोंद)

दरम्यान, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे. तसेच कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने त्यासंदर्भात संशोधन केले जात आहे. तर WHO यांनी कोरोनावरील लस येण्यासाठी पुढचे वर्ष येईल असे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात येत्या 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.