महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता घराबाहेर पडताना सर्वोतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचसोबत नियमांचे सुद्धा पालन करणे अनिवार्य असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच दरम्यान मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) आज कोरोनाच्या आणखी 12 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2359 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.(Lockdown in Thane: ठाणे राहणार आणखी 7 दिवस बंद; TMC परिसरात 12 जुलै 2020 ते 19 जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर)
कोरोना प्रादर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर सध्या धारावीतील कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे ही दिसून येत आहे.(औरंगाबाद मध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आजपासून कडक लॉकडाऊन लागू)
COVID-19 tally in Mumbai's Dharavi slum rises to 2,359 with 12 new cases: BMC
— Press Trust of India (@PTI_News) July 10, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 6,875 नवीन रुग्णांची वाढ झाली, यानुसार राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 2,30,599 वर पोहचला आहे. याशिवाय कालच्या दिवसात मृत्यू झालेल्या 219 रुग्णांसहित कोरोना मृतांची संख्या सुद्धा 9,667 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1,27,259 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 93,652 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.