School Children (Photo Credits: Pixabay)

बीएमसी शिक्षण मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता आता मुंबई महानगर पालिकेची एक शाळा सीबीएसई (CBSE) आणि एक शाळा आयसीएसई (ICSE) बोर्डासोबत संलग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून आता पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाचं शिक्षण घेता येणार आहे. 'द वूलन मिल म्युनिसिपल स्कूल' ही दादर येथील शाळा आयसीएसई तर अंधेरीतील पूनम नगर स्कूल सीबीएसई बोर्ड मध्ये संलग्न करण्यात येणार आहे. मुंबई मध्ये BMC लवकरच CBSE, ICSE मंडळाच्या शाळा सुरू करण्याच्या तयारीत; शिक्षण समितीच्या बैठकीत प्रस्ताव.  

मुंबई महानगर पालिकांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी पालिका आता राज्य बोर्डाप्रमाणेच आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाची सुरूवात करणार आहेत. तर हा प्रोजेक्ट 'पायलट प्रोजेक्ट' असेल.

एका लॉटरीच्या द्वारा प्री-प्रायमरी ते 6 वीच्या विद्यार्थ्यांना नव्या बोर्डसाठी निवडलं जाईल. तर बोर्डाच्या शिक्षणाचा खर्च पालिकेकडून केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा अतिरिक्त भार द्यावा लागणार नाही. मागील वर्षी महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड सोबत संलग्न करण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र त्यांनी त्याची फी आकारल्याने पालिकेने हा प्रस्ताव अमान्य केला होता.