Mumbai- Delhi Air India Flight Cancelled (Photo Credits: ANI)

मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Mumbai CSIA)  आज 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) निर्णयानुसार प्रति दिवशी प्रत्येकी विमानांच्या लॅन्डिंग - टेक ऑफला परवानगी देण्यात आली आहे. मात्र आज पहिल्याच दिवशी Air India चं दिल्लीला (Air INdia Delhi Flight) जाणारं विमान पूर्वसूचना न देता रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. दिल्लीला जाणाऱ्या या विमानाच्या एका प्रवासी महिलेने याविषयी ANI शी बोलताना सांगितले की, एअर इंडियाचे विमान आज सकाळी दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण करणार होते, मात्र काही वेळाने हे विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली, याबाबात कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. हे विमान रद्द झाल्याने आता अनेक प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केली नवी नियमावली; जाणून घ्या प्रवासादरम्यान कोणती खबरदारी घ्याल

देशातील अनेक राज्यातून आज पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या विमानतळांवर प्रवाशांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेण्यात बराच वेळ घेतला होता, महाराष्ट्र हा कोरोनाचे हॉटस्पॉट आहे त्यातही मुंबई हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशावेळी विमानसेवा सुरु केल्यास पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू शकतो अशी शक्यता वर्तवत महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेण्यास वेळ लावला होता. मात्र अखेरीस एका दिवशी 25 विमानाच्या उड्डाण आणि लँडिंगची अट ठेवत या निर्णयाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.

पहा ट्विट

दरम्यान, मुंबईतील कोरोना व्हायरसचा प्रसार पाहता विमानतळावर येताना तसेच प्रवाशाच्या दरम्यान प्रवाशांनी आवश्यक ती सर्व खबरदारी बाळगणायचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार सकाळपासून जरी विमानतळावर गर्दी पाहायला मिळत असली तरी कुठेही सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडले जाणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.