मुंबई: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत; लोकल सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्या 25-30 मिनिटं उशिरा
Mumbai local | (Archived and representative images)

Central Line Rail Service Update: कर्जत (Karjat) व पळसधरी (Palasdhari) दरम्यान रेल्वे मार्गावर मालगाडी बिघडल्याने आज (11 एप्रिल) दिवशी मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकसत्ताच्या वृत्तनुसार, लोणावळ्याकडे जाणाऱ्या मालगाडीचे कपलिगं तुटल्याने मालगाडी येथे ट्रॅकवर उभी आहे. परिणामी लोकल सेवादेखील विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीकडे (CSMT) जाणारी लोकलसेवा सुमारे 25-30 मिनिटं उशिराने धावत आहे.

 प्रवाशांचे ट्विट

लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या

मुबंई-खोपोली, मुंबई-पुणे लोकल व एक्सप्रेस सेवा सध्या रेंगाळली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसला आहे. जलद मार्गावरील काही लोकलसेवादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.