पहिली ते आठवी वर्गाच्या ऑफलाइन परीक्षेसाठी जबरदस्ती नको- BMC
School Reopen | Representative image (PC - Wikimedia Commons)

राज्यासह मुंबईत शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शाळांना काही नियम ही लागू करण्यात आले आहेत. अशातच पहिले ते आठवी वर्गासाठी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी जबरस्ती नको असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकल यांनी असे म्हटले की, राज्य आणि नॉन-बोर्ड शाळांसाठी ऑनलाईन हा पर्याय दिला गेला आहे. त्यामुळे पहिले ते आठवीचे वर्ग ह महापालिकेच्या अंतर्गत येतात.

सध्या बहुतांश शाळांचे वर्ग हे ऑनलाइन पद्धतीने सुरु आहेत. परंतु पालकांकडून अशी तक्रार करण्यात येत आहे की, काही शाळा या मुलांना वर्गात येऊन परीक्षा देण्यासाठी बळजबरी करत आहेत. तर 24 जानेवारी नंतर पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यान 60 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी ऑफलाइन वर्गासाठी येत असल्याचे मुख्याध्यापकांनी म्हटले आहे. मात्र परीक्षेबद्दल बोलायचे झाल्यास ऑनलाईन पद्धतीने त्या घ्यावात असे बहुतांश जणांचे मत आहे.(School: शाळेची फी न भरल्याने पुण्यातील एका शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले, पालकांनी केली कारवाईची मागणी)

तसेच 9-12 वी चे वर्ग हे राज्याती शिक्षण विभागाअंतर्गत येतात. त्यामुळे परीक्षा या ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात. राज्याकडून परीक्षेसंदर्भात कोणताही आक्षेप घेतला जात नाही आहे. पुढील महिन्यापासून 10 वी बोर्डाची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा सुरु होणार आहे. त्यामुळे शाळांकडून प्रिलिम्स या वर्गात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे पालकांनी समजून घ्यावे की, ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे महत्व समजून घ्यावे आणि मुलांना सुद्धा त्यासाठी प्रोत्साहन करावे असे माटुंगा येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हटले आहे.