प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

चार वर्षापूर्वी एका वकिलाने आपल्या पेक्षा 40 वर्ष वयाने कमी असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले होते. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.तर चौदाव्या वर्षी विवाहास मान्यता दिली असली तरीही संसार सुरु करण्यासाठी मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक असल्याचे आता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तर मुलीचे आता वय 18 पूर्ण झाले असून ती कायद्याने या व्यक्तीसोबत पत्नी म्हणून राहण्याची इच्छा असल्याने तिने कोर्टात सांगितले आहे. तर 2 मे रोजी या व्यक्तिला मुलीच्या नावावर 11 एकर जमीन, 7 लाख रुपयांची एफडी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी असे आदेश दिला होता.

तत्पूर्वी डिसेंबर 2017 रोजी पती आणि परिवाराच्या विरुद्ध चाईल्ड मॅरेज अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 28 डिसेंबर रोजी यांना जामिन देण्यापूर्वी आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या 10 दिवसानंतर त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्याचे अपील केले होते.(आंतरजातीय विवाह: लेकीसह जावयाला पेटवले; अहमदनगर येथील घटना)

न्यायाधीश रंजीत मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, जर हा खटला सुरु राहिल्यास मुलीचे लग्न झाल्यामुळे तिचा  सांभाळ करावा लागेल. त्याचसोबत पत्नीच्या नात्याने तिला कोणताही समाज स्विकार करणार नसल्याचे म्हटले आहे. तर मुलीचे भवितव्य सुरक्षित करणे ही प्रथम जबाबदारी आहे.

तसेच उच्च न्यायालयाने निर्णय स्पष्ट करत फेब्रुवारी 2020 मध्ये यावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. कारण कोर्ट त्यावेळी मुलीचे शिक्षण आणि पती तिचा योग्य प्रकारे सांभाळ करत आहे की नाही हे त्यावेळी पाहिले जाणार आहे.