(प्रतिकात्मक फोटो सौजन्य-फेसबुक)

सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्थानकाबाहेरील हिमालय पूल (Himalaya Bridge) दुर्घटनेनंतर प्रशासनाला आता जाग आली असून मुंबईतील (Mumbai) विविध ठिकाणी असलेले धोकादायक पूल पुर्नबांधणीसाठी बंद करण्यात येत आहे. आता मुंबईतील प्रसिद्ध सैफी हॉस्पिटल (Saifee Hospital)  येथील चर्नी रोड (Charni Road) स्थानकाला जोडणारा पादचारी पूल धोकादायक असल्याचे महापालिकेकडून घोषित करण्यात आले आहे.

सैफी हॉस्पिटलजवळील पादचारी पूल धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना सैफी हॉस्पिटल येथून चर्नी रोड रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी दुसरा मार्ग सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी पादचाऱ्यांनी चर्नी रोड रेल्वेस्थानकात जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील जिन्यांचा वापर करावा अशी सूचना महापालिकेने दिली आहे.(मुंबईतील 29 धोकादायक पूल महापालिका पाडणार, नागरिकांची कोंडी होणार)

धोकादायक पूल बंद सूचना (फोटो सौजन्य-ट्वीटर)

नागरिकांना यामुळे गैरसोय होणार आहे. मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेच्या हेतूने मुंबईतील धोकादायक पूल बंद करण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा डोंबिवली येथील पूल धोकादायक असल्याने बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.