मुंबईत आजपासून प्रवाशांसाठी BEST च्या 60 डबल-डेकर धावणार
BEST Double-Deckers (Photo Credits-Twitter)

राज्य सरकाने मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आजपासून मुंबईत बेस्टच्या (BEST) 60 डबल-डेकर बस धावणार आहेत. डबल-डेकर (Double-Deckers) बसमध्ये एकूण 90 प्रवाशांच्या बसण्याची सोय आहे. परंतु फक्त 45 प्रवाशांना या डबल डेकरच्या माध्यमातून प्रवास करता येणार असून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात येणार आहे. परंतु सर्वसामान्य बस या सुद्धा सुरु असून यामधून फक्त 25 प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी आहे. तर 5 जणांचा उभे राहण्यासाठी ही मुभा असणार आहे.(COVID19 मुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांना पोलिसांचा इशारा)

बेस्ट बसने प्रवाश करणाऱ्या प्रवाशांची आठवड्याभरातील आकडेवारी पाहता ती 10-15 लाखांपर्यंत आहे. त्यामुळेच वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे अधिक बेस्ट सुरु करण्याची गरज आहे. सध्या 3200 बस प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असून आता डबल-डेकर सुद्धा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे रविवारी बेस्ट अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.(Train Update: ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर 13 जुलैपासून विशेष उपनगरीय सेवा पुन्हा सुरु होणार)

बेस्ट बसच्या स्थानकांसह मार्गाची या आठवड्यात घोषणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकाचा सुद्धा समावेश असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधांमधील 2.5 लाख कर्मचारी जे मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करतात त्यांना याचा फायदा होणार आहे. डबल डेकरसाठी सीएसएमटी ते नरिमन पॉइंट/कफ परेड, कुलाबा ते वरळी आणि अंधेरी ते सिप्झ असा मार्ग असणार आहे. 120 डबल डेकर पैकी आता 60 बसला सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र उर्वरित डबल डेकर ही प्रवशांच्या संख्येनुसार सुरु करायची की नाही याचा विचार करण्यात येणार आहे.