Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. तर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने सरकारने संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान मुंबईत ही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असला तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. खासकरुन रात्रीच्या वेळेस वाहतूकीचे प्रमाण वाढलेले मुंबईत दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. संचार बंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्यांनाच परवानगी असणार आहे.(मुंबई: राजभवन मधील 18 कर्मचाऱ्यांची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी झाले Quarantine)

मुंबई पोलिसांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, संचारबंदी रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कायम असणार आहे. परंतु या काळात बहुतांश गाड्या ज्या अत्यावश्यक सेवासुविधा पुरवत नाहीत त्या सुद्धा बाहेर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात आयपीसी कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कलम 144 लागू करण्यासह संचारबंदी सु्द्धा आहे. मात्र नागरिकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 16 हजार गाड्यांवर 30 जून पर्यंत कारवाई केली आहे.(Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणून घ्या एका क्लिक वर List Inside)

दरम्यान, मुंबईत  शनिवारी (11 जुलै) कोरोनाच्या आणखी 1308 रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1497 जणांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 91,457 वर पोहचला असून त्यापैकी 63,41 जणांची प्रकृती सुधारली आहे. 22,779 अॅक्टिव्ह रुग्ण असून 5,241 जणांचा बळी गेल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यावेळी नियमांचे पालन करावे असे ही आवाहन सराकरकडून करण्यात आले आहे.