Representational Image (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेकडून (Central Railway) विशेष उपनगरीय सेवा ट्रान्स हार्बर मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. मात्र ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार असून 13 जुलैपासून यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही सुविधा ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर (Thane-Vashi TransHarour Line) मार्गासाठी सुरु होणार आहे. पहिली ट्रेन सकाळी 7.30 वाजता ठाणे येथून सुटणार आहे. तर दुसरी ट्रेन वाशी येथून दुपारी 4.30 वाजता सोडली जाणार आहे.

मध्य रेल्वेचे चीफ स्पोकपर्सन शिवाजी सुतार यांनी असे म्हटले आहे की, या ट्रेनच्या सुविधेचा लाभ सरकारी कार्यालयांसह अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. त्याचसोबत सानपाड्याच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करतात ते सुद्धा या विशेष ट्रेनने प्रवास करु शकणार आहेत. तसेच ठाणे आणि त्याच्या पुढे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. (MMRDA Vacancy 2020: जुनियर इंजिनियर, ट्रेन ऑपरेटर सह अन्य पदांवर मोठी भरती; mmrda.maharashtra.gov.in वर करा 27 जुलैपूर्वी ऑनलाईन अर्ज)

Trans Harbour Train Update: ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर आजपासून विशेष उपनगरीय सेवा पुन्हा सुरु - Watch Video

सुतार यांनी पुढे असे म्हटले आहे की, या दोन सुविधांची यापुर्वीपासून सुरु असलेल्या मुख्य आणि मुंबई विभागाच्या 350 सर्विसमध्ये भर केली आहे. ही विशेष ट्रेन रबाळे, कोपरखैराणे, तुर्भे आणि सानपाडा स्थानकात थांबणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपनगरीय सेवासुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे अन्य नागरिकांनी रेल्वेमधून प्रवास करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. ही सुविधा सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्याचसोबत प्रवाशांनी कोविड19 साठी लागू केलेल्या नियमांचे सुद्धा पालन करणे अत्यावश्यक आहे. मध्य रेल्वेकडून एकूण 352 ट्रेन आणि मध्य रेल्वेकडून 350 ट्रेन चालविल्या जातात. उपनगरीय रेल्वेसेवेच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाला 2 ते 2.5 लाख नागरिक प्रवास करतात.