Mumbai Metro | Representational Image | (Photo Credits: ANI)

कोरोना संकटकाळात कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जागतिक मंदीच्या सावटामध्ये असतानाही आता मुंबई शहरात नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. दरम्यान मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेवलपमेंट अथॉरिटी (MMRDA)कडून आता टेक्नीशियन, टेक्नीशियन सिविल, ट्रेन ऑपरेटर, जूनियर इंजीनियर आणि ट्रैफिक कंट्रोलर या पदांसह अन्य काही पदांसाठी आता नोकरभरती जाहीर केली आहे. दरम्यान याच्यामधून आता 110 पदांवर नियुक्ती होणार आहे. याची जाहिरात एमएमआरडीए च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: MMRDA Recruitment 2020: गवंडी, वेल्डर, इलेक्ट्रिशन, फीटर ते अकुशल कामगारांना एमएमआरडीए मध्ये पायाभूत प्रकल्पांमध्ये 16726 रोजगाराच्या संधी उपलब्ध; mmrda.maharashtra.gov.in नोटिफिकेशन जारी, इथे करा संपर्क.

दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यापूर्वी ऑफिशिएल नोटिफिकेशन वाचणं गरजेचे आहे. पदानुसार, क्वालिफिकेशन पहा,वयोमर्यादा बघूनच अर्ज दाखल करा. दरम्यान अर्जामध्ये त्रुटी असतील , पात्रता निकषांमध्ये तुमचा अर्ज नसेल तर तुमचा अर्ज बेदखल होऊ शकतो.

या पदांवर अर्ज करण्यासाठी 27 जून ते 27 जुलै या महिन्याभराचा कालावधी तुमच्याकडे आहे. यामध्ये उमेदवारांना एक महिना दिला जाईल. शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका.वेळीच अर्ज दाखल करा. सोबतच जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना 300 रूपये आणि आरक्षित कॅटेगरीच्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 150 रूपये फी आकारली जाणार आहे.

दरम्यान टेक्निकल पदावर निवडले जाणार उमेदवार यांना 25,500 ते 82,100 इतका पगार दिला जाणार आहे. तर टेक्नीशियन (सिविल) साठी 19,900 ते 63,200 रूपये पगाराची स्केल असेल. टेक्नीशियन (एसएंडटी) साठि 19,900 ते 63,200 प्रति महिना पगार असेल. इतर पदासाठी अर्ज करू इच्छिणार्‍या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगाराची माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.