वांद्रे: लग्न समारंभावेळी नववधुच्या मैत्रीणीकडून 7 लाख रुपयांचा सोन्याच्या हारावर डल्ला, पोलिसांकडून अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतल्या वांद्रे (Bandra) येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लग्नसोहळ्यात नववधूच्या मैत्रिणीने 7 लाख रुपयांचा सोन्याचा हार चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.

लग्न समारंभाची तयारी सुरु असताना नववधूने तिच्या मैत्रीणीला तिचा सोन्याचा हार दाखवला आणि तिच्या बॅगमध्ये ठेवला. त्यानंतर काही वेळाने त्या नववधूने काही कारणासाठी बॅक उघडली असता तिच्या बॅगमधील तो सोन्याचा हार गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली.(पुण्यात 6 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण, अत्याचार करणारे दोन्ही आरोपीसुद्धा अल्पवयीन)

पोलिसांनी तपासणी करत असताना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. त्यावेळी संशयास्पद हालचाल करणारी एक व्यक्ती दिसल्याने त्या व्यक्तीचा शोध घेतला गेला. अखेर ती व्यक्ती नववधूची मैत्रीणच असल्याचे समोर आले. या महिलेला अटक केली असता तिने आपल्याला तो हार आवडला असल्याने चोरी केला असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांना दिले आहे.